Posts

Showing posts from April, 2018

Dr. Gangadhar Pantawane

Image
            तरुणाईचे प्रबळ पाठीराखे डॉ . गंगाधर पानतावणे                                                   - डॉ. राजेंद्र गोणारकर  डॉ .   गंगाधर पानतावणे यांचे आंबेडकरी साहित्य संस्कृती विश्वातील कार्य अजोड असेच आहे .   तब्बल पन्नास वर्ष “ अस्मितादर्श ” या   वाङमयीन नियतकालिकाच्या माध्यमातून आंबेडकरी साहित्याला आधार , ब ळ व   अखंड ऊर्जा देणारे त्यांचे योगदान थोर आहे . डॉ . गंगाधर पानतावणे सरां च्या   व्यक्तिमत्त्वाला असंख्य पैलू होते . ते व्यासंगी समीक्षक होते , बुद्धिवादी विचारवंत होते , सव्यसाची संपादक होते , स्वतः सृजनशील लेखक होते . मराठीचे विद्वान प्राध्यापक होते . पण आमच्यासाठी ते आमचे सर होते , मार्गदर्शक होते .   मला आठवतं मी जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ एम . ए .( समाजशास्त्र ) ला प्रवेश घेतला त्यावेळेस (1994) पानतावणे सर मराठी विभागामध्ये प्रो...

Ramabai Ambedkar

Image
एक दंतकथा वाटावी इतकी रमाईच्या जीवनाची कहाणी अद्भुत आहे.असीम त्याग, अतोनात कष्ट, आभाळाएवढी सहनशीलता,धरतीची उदारता, नक्षत्रलख्ख चारित्र्य ,निस्सीम प्रेम याचे मूर्तिमंत रूप म्हणजे रमाई. त्यांची जीवन कहाणी ही अश्रूंची गाथा आहे, पण हे असे दुःख आहे ज्याने वंचितांच्या जीवनात उजेडाची वस्ती आणली , सुखाचे सोहळे आणले, सन्मानाचे जगणे आणलेे. अखंड सोसणे आणि बाबासाहेबांना अविरत साथ देणे, हेच रमाईच्या जगण्याचे  संविधान होते।             रमाईच्या जीवनावर कादंबरी लिहीणे ही सोपी गोष्ट नाही. रमाईशी,त्यांच्या वेदनेशी जोडून घेतल्याशिवाय असे लेखन करणे अवघड आहे.आयुष्मती लता शिंदे यांनी अत्यंत सहृदयतेने रमाईचे चरित्र तपशिलासह रेखाटले आहे. कादंबरीची भाषा वेधक आहे. ती वाचकांच्या  मनाचा ठाव घेते. ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. आयुष्मती लता नागनाथ शिंदे लिखित "माझी रमाई"  ही चरित्रात्मक कादंबरी वाचकांना निश्चितच प्रेरक ठरेल, असा विश्वास वाटतो।                                   ...