निळ्या माणसांची निळी नाती
निळ्या माणसांची निळी नाती
१.
निळे पहाड
निळे पाणी
निळ्या स्पंदनाची
निळी कहाणी
२.
निळे आभाळ
निळा वारा
निळ्या पाखरांचा
निळा निवारा
३.
निळी आग
निळी जाग
निळ्या फुलांची
निळी बाग
४.
निळी पुस्तके
निळी पाने
निळ्या क्रांतिचे
निळे गाणे
५.
निळे झेंडे
निळ्या घोषणा
निळ्या डोळ्यांच्या
निळ्या तृष्णा
६.
निळे डोंगर
निळ्या वाटा
निळ्या पावलांच्या
निळ्या लाटा
७.
निळी बालके
निळे फुगे
निळ्या क्षितिजावर
निळी युगे
८.
निळे श्वास
निळे ध्यास
निळ्या पृथ्वीचा
निळा व्यास
९.
निळी माता
निळी ममता
निळ्या पदरात
निळी समता
१०.
निळा सूर्य
निळी माती
निळ्या माणसांची
निळी नाती
- - राजेंद्र
गोणारकर
Comments
Post a Comment