पीपल्स एज्यूकेशन सोसायटी (मुंबई )चे मिलिंद कला महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या वतीने दिला जाणारा 2016 चा 'मिलिंद समता पुरस्कार ' प्रख्यात विचारवंत डॉ. रूपाताई कुलकर्णी- बोधी यांना प्रदान करताना डावीकडून भंते डॉ. सत्यपाल , प्रा. पवार, प्रा. संतोष बुरकुल, डॉ. रूपाताई कुलकर्णी- बोधी, प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान , डॉ. राजेंद्र गोणारकर व डॉ. देसले .
Dr. Gangadhar Pantawane
तरुणाईचे प्रबळ पाठीराखे डॉ . गंगाधर पानतावणे - डॉ. राजेंद्र गोणारकर डॉ . गंगाधर पानतावणे यांचे आंबेडकरी साहित्य संस्कृती विश्वातील कार्य अजोड असेच आहे . तब्बल पन्नास वर्ष “ अस्मितादर्श ” या वाङमयीन नियतकालिकाच्या माध्यमातून आंबेडकरी साहित्याला आधार , ब ळ व अखंड ऊर्जा देणारे त्यांचे योगदान थोर आहे . डॉ . गंगाधर पानतावणे सरां च्या व्यक्तिमत्त्वाला असंख्य पैलू होते . ते व्यासंगी समीक्षक होते , बुद्धिवादी विचारवंत होते , सव्यसाची संपादक होते , स्वतः सृजनशील लेखक होते . मराठीचे विद्वान प्राध्यापक होते . पण आमच्यासाठी ते आमचे सर होते , मार्गदर्शक होते . मला आठवतं मी जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ एम . ए .( समाजशास्त्र ) ला प्रवेश घेतला त्यावेळेस (1994) पानतावणे सर मराठी विभागामध्ये प्रो...

Comments
Post a Comment