धर्मांतराचे वैश्विक संदर्भ

¨ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचे वैश्विक संदर्भ -डॉ. राजेंद्र गोणारकर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आणि कृतीचे आकलन करतांना त्याचे भारतीय संदर्भ जसे पहावे लागतात तद्वतच त्याचे वैश्विक संदर्भ देखील समजून घ्यावे लागतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले धर्मांतर ही भारतीय पातळीवर अभूतपूर्व अशी घटना होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत केलेले हे धर्मांतर भारतातील विषमतेला जन्म देणार्या चातुर्वर्ण्यव्यवस्थेला दिलेले सडेतोड उत्तर होते. या धर्मांतराने पशूपेक्षा हीन मानल्या गेलेल्या अस्पृश्य समाजाला स्वाभिमानाचे जिणे दिले. व्यवस्थेने हजारो वर्ष त्याच्यापासून हिरावून घेतलेले त्याचे माणूसपण त्याला दिले . अल्पावधीत धर्मांतरीत बौद्धांनी केलेली प्रगती खचितच विस्मय वाटावा अशी आहे , म्हणूनच या धर्मांतराला खूप मोल आहे. ...