Rajendra Gonarkar Profile

 


प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर

 

जन्म: 8 मार्च 1974 (सोमठाणा ता. नायगाव जि. नांदेड )

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात वृत्तपत्र विद्या व जसंवाद या विषयाचे सहयोगी प्राध्यापक. समाजशास्त्र व मुद्रित तथा लेक्ट्रोनिक माध्यमाचे साक्षेपी अभ्यासक.

पुरोगामी चळवळीतील कवी, लेखक व वक्ता म्हणूनही लौकिक. विविध वृत्तपत्र व नियतकालिकांमधून ५०० हून अधिक लेख प्रकाशित. व्याख्यानमालामधून बुद्ध- फुले- आंबेडकर यांच्या विचार व कार्यावर सतत प्रबोधन. आकाशवाणी केंद्रावरून विविध विषयावरील रूपकांचे लेखन व प्रसारण, आकाशवाणी केंद्रासाठी विचारपुष्प या मालेत तथागत बुद्ध यांच्या विचारांवर आधारित २० भागांचे लेखन व प्रसारण.

विद्यार्थी चळवळ व विविध सामाजिक व साहित्यिक चळवळीत सक्रीय सहभाग. भारतीय बौद्ध महासभेच्या उपक्रमांधून १९९८ पासून सक्रिय सहभाग.  

वृत्तपत्र व नियतकालिकमध्ये सहयोगी संपादक म्हणून काही काळ सेवा.

 

शिक्षण :

एम. ए., एम. फील., पीएच. डी. (समाजशास्त्र) ,

B. J.(बॅचलर ऑफ जर्नालिझम), M.M.C.J.(मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम )

पीएच. डी. (मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम)

पीजी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक मीडिया मॅनेजमेंट अँड फिल्म प्रोडक्शन

 

SET and NET in Sociology

 

NET in Mass Communication and Journalism

 

पीएच. डी.- समाजशास्त्र - प्राचीन भारतीय समाज: चार्वाकाच्या जडवादी विचारप्रणालीचा समाजशास्त्रीय अभ्यास

पीएच. डी.-मास कम्युनिकेशन अँड  जर्नालिझम - सत्यजित राय यांची अपू चित्रत्रयी : विश्लेषणात्मक अभ्यास.

 

 

प्रकाशित पुस्तके

1.अनारंभ (कवितासंग्रह),

2.निळे आकाश (संपादन),

3.सूर्यपक्षी (संपादन),

4. अण्णा भाऊ साठे लिखित बुद्धाची शपथ (संपादन),

5.अकरावी समाजशास्त्र( मॅकमिलन पब्लिकेशन),

6.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पत्रसंवाद,

7. मूकनायक व बहिष्कृत भारत मधील पत्रव्यवहार,

8.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अग्रलेखातून साधलेला लोकसंवाद,

9. म. जोतीराव फुले यांच्या अखंडातून साधलेला लोकसंवाद,

10. मराठवाड्यातील आंबेडकरी प्रबोधनपर्व,

11. प्रज्ञावंत योद्धा :राजा ढाले 

आदी पुस्तके प्रकाशित.

 

- नांदेड कल्चरल असोसिएशनचे -उपाध्यक्ष

-जयभीम या दरवर्षी प्रकाशित होणार्‍या विशेषांकाचे -संपादक   

 

 

 

पुरस्कार

शब्दरंजन काव्य पुरस्कार

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार

 

 

 

औरंगाबाद, बीड,उदगीर, हदगाव, अहमदनगर येथे समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सेवा ।

सध्या (२००९ पासून)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत.

Comments

Popular posts from this blog

Anna Bhau Sathe /अण्णा भाऊ साठे : वेदना आणि संघर्षाचे भाष्यकार

Dr. Gangadhar Pantawane

दलित, विद्रोही कविताच खरी भारतीय कविता! Loknath Yashwant