buddha

बुद्धाचा प्रतित्यसमुत्पाद : प्रज्ञेची भूमी डॉ. राजेंद्र गोणारकर “बुद्धाचा प्रतित्यसमुत्पाद” हे मधुकर पाईकराव लिखित पुस्तक बुद्ध विचारांचे केलेले सुबोध आणि रसाळ विवेचन आहे. देकार्त म्हणाला होता मी विचार करतो म्हणून मी आहे ( I think therefore I am ) पण बुद्धाने केवळ विचार करायला शिकविले नाही तर मानवी कल्याणाचा विचार क रा यला शिकविले. बुद्ध जे काही बोलले ते अत्यंत तर्कशुद्ध होते. पण ते कोरडे मुळीच नव्हते. करुणेचा असीम ओलावा त्यात ओतप्रोत भरलेला होता. बुद्धाने विषमता हाच अ लंकार मानणार्या वैदिक संस्कृतीला नकार दिला हे खरेच आहे. बुद्धाने जगातील सर्व तर्हेच्या विषमतेला निर्णायक विरोध केला.जगात जिथे कुठे विषमता आहे , जिथे कुठे स्त्रियांना दुय्यम वागणूक आहे , जगात जिथे कुठे शोषण आहे , पिळवणूक , दमन आहे. त्या सर्व व्यवस्थेला पर्याय म्हणून बुद्धाने स्वातंत्र्य , समता , आणि बंधुतेचा उदघोष केला. हा नवा विचार होता. सर्व मानवांना उन्नत करणारा हा विचार होता. म्हणून जगभर बुद्ध विचारांना अ नुयायी मिळाले. बुद्ध विचार देणारा भारत देश जगासाठी आदरणीय भूमी बनला. पण असे असून ही भारतातू...