Posts

दलित पॅन्थर Dalit Panthar

Image
 

दलित -वंचित -बहुजन व मुस्लिम आघाडी निवडणुकांच्या पल्याड जावी !

Image
  दलित - वंचित - बहुजन व मुस्लिम आघाडी निवडणुकांच्या पल्याड जावी !   मराठा मोर्चे , प्रती मोर्चे , भीमा कोरेगावचा हिंसाचार या घटनांनी महाराराष्ट्राचे राजकारणच नव्हे तर समाजजीवन एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे . सोबतच प्रकाश आंबेडकर नाव हे अलीकडे विशेषतः एल्गार परिषद , भीमा कोरेगाव   हिंसाचारानंतरचा महाराष्ट्र बंद , भिडेच्या अटकेसाठीचा मुंबईतील भव्य मोर्चा यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष चर्चेत आले आहे .   निववडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बहुजन राजकारणाचा एक भाग म्हणून धनगर , ओबीसी , भटके - विमुक्त , आदिवासी आणि दलित याची एकत्रित मूठ बांधून " दलित वंचित बहुजन आघाडी " स्थापन केली . महाराष्ट्राच्या विविध भागात सभा , परिषदा , बैठका घेऊन बरीच जमावाजमव केली . २०१९ची निवडणूक ही भारतीय राजकारणातील महत्त्वाची निवडणूक आहे .   हे यासाठी की लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेले आणि लोकशाही प्रणालीला जागोजागी हरताळ फासणारे हे सरकार आहे . विकासाच्या वल्गना करणारे हे सरक