Posts

Showing posts from May, 2017

buddha

Image
बुद्धाचा प्रतित्यसमुत्पाद : प्रज्ञेची भूमी डॉ. राजेंद्र गोणारकर “बुद्धाचा प्रतित्यसमुत्पाद” हे मधुकर पाईकराव लिखित पुस्तक बुद्ध विचारांचे केलेले सुबोध आणि रसाळ विवेचन आहे. देकार्त म्हणाला होता मी विचार करतो म्हणून मी आहे ( I think therefore I am ) पण बुद्धाने केवळ विचार करायला शिकविले नाही तर मानवी कल्याणाचा विचार क रा यला शिकविले. बुद्ध जे काही बोलले ते अत्यंत तर्कशुद्ध होते. पण ते कोरडे मुळीच नव्हते. करुणेचा असीम ओलावा त्यात ओतप्रोत भरलेला होता. बुद्धाने विषमता हाच अ लंकार मानणार्‍या वैदिक संस्कृतीला नकार दिला हे खरेच आहे. बुद्धाने जगातील सर्व तर्‍हेच्या विषमतेला निर्णायक विरोध केला.जगात जिथे कुठे विषमता आहे , जिथे कुठे स्त्रियांना दुय्यम वागणूक आहे , जगात जिथे कुठे शोषण आहे , पिळवणूक , दमन आहे. त्या सर्व व्यवस्थेला पर्याय म्हणून बुद्धाने स्वातंत्र्य , समता , आणि बंधुतेचा उदघोष केला. हा नवा विचार होता. सर्व मानवांना उन्नत करणारा हा विचार होता. म्हणून जगभर बुद्ध विचारांना अ नुयायी मिळाले. बुद्ध विचार देणारा भारत देश जगासाठी आदरणीय भूमी बनला. पण असे असून ही भारतातू

jyotirao Phule by Rajendra Gonarkar

Image
म . जोतीराव फुले एकोणीसावं शतक हे भारतात नव्या मूल्यांची पेरणी करणारं शतक होतं . ब्रिटीशांनी सुरू केलेल्या शिक्षणामुळं नव शिक्षित तरुणांना   आपल्या भोवतीच्या सामाजिक विसंगती आणि धार्मिक अवडंबराचं स्तोम नकोसं वाटत होतं . समाजातील कालबाह्य रूढी परंपरा यांना दूर सारून आधुनिक मूल्यांवर आधारित नवा समाज निर्माण व्हावा , अशी मनोभूमिका तरुणांमध्ये निर्माण झाली होती . यातूनच सुधारणावादी चळवळीचा जन्म झाला . या सुधारणावादी चळवळीचे राजा राममोहन रॉय , ईश्वरचंद्र विद्यासागर , महादेव गोविंद रानडे , गोपाल गणेश आगरकर , महर्षी धोंडो केशव कर्वे , लोकहितवादी आदि दिग्गज हिरीरीने नेतृत्व करीत होते . याच कालखंडात महात्मा जोतीराव फुल्यांनी प्रागतिक विचारांचा वसा घेऊन समाज परिवर्तनाचे अद्वितीय कार्य केले . क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची त्यांना कणखर साथ मिळाली .      म . जोतीराव फुले हे शेतकरी , कामगार , दलित आणि स्त्रिया यांचे कृतीशील कैवारी होते . रयतेचे ते क्रांतिकारी तत्वज्ञ होते . शूद्रातिशूद्राना आणि स्त्रियांना ज्ञानाचे दरवाजे खुले करणारी चळवळ त्यांनी सुरू केली . भारतातील शूद्र , अति

Dr. Rajendra Gonarkar at Bibi ka Makbara, Aurangabad

Image