Posts

Showing posts from February, 2016

दलित, विद्रोही कविताच खरी भारतीय कविता! Loknath Yashwant

Image
(डावीकडून राजेंद्र गोणारकर , ऋषिकेश कांबळे , कवी लोकनाथ यशवंत  व संजय घरडे)  दलित, विद्रोही कविताच खरी भारतीय कविता! - लोकनाथ यशवंत  वाशिम: पूर्वीच्या कविता हिंदुस्थानी होत्या. त्यामध्ये चंद्र, तारे, नदी, फुले, वारे यांच्या भावना व संवेदना उमटत होत्या; मात्र त्या कवितांमध्ये माणसांच्या संवेदनाचे प्रतिबिंब कुठेच दिसत नव्हते; परंतु दलित व विद्रोही कवितेने माणसाच्या जाणिवा आणि संवेदनाचे प्रतिबिंब साहित्यात उमटवले. म्हणूनच तीच खरी भारतीय कविता आहे, असे मत प्रसिद्ध कवी व साहित्यिक लोकनाथ यशवं त यांनी येथे व्यक्त केले. ३३ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशीच्या दुपारच्या सत्रात कवी लोकनाथ यशवंत यांची प्रकट मुलाखत डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. संजय घरडे आणि ऋषिकेश कांबळे यांनी घेतली. यावेळी लोकनाथ यशवंत यांनी सडेतोड उत्तरे दिली. बदलत्या काळात कवितेकडे कसे पाहता? या प्रश्नावर बदलत्या काळात कविताही बदलत आहे; परंतु आता सर्व जगात धर्म प्रभावी ठरत आहे. खरे तर धर्मातूनच आजचा दहशतवाद जन्माला आला आहे. मी तर म्हणतो माणसाला कोणत्याही धर्माची गरजच नाही. त्यांनी चार-पाच तत्त्व पाळाव