Posts

Showing posts from 2014
Image
Rajendra Gonarkar with welknown Media Critic Jaideo Dole at School of Media Studies, SRTM University, Nanded (M.S.

म. जोतीराव फुले यांचे स्मरण करतांना ....

Image
म. जोतीराव फुले यांचे स्मरण करतांना  .... .                                                             डॉ . राजेंद्र गोणारकर                                                                         ९८९०६१९२७४ तमाम बहुजनांचे कृ ति शील कैवारी असणार्‍या म . जोतीराव फुले यांच्या निधनास २८ नोव्हेंबर २०१५ रोजी १२५ पूर्ण होतील.  त्यांच्या शतकोत्तर रौप्य स्मृतिवर्षास आजपासून (२८ नोव्हेंबर २०१४)  प्रारंभ होत आहे. त्या निमित्त हा लेख. ________________________________________________________         भारतातील तमाम बहुजनांच्या शिक्षणा चे ज्ञानपीठ म्हणजे म . जोतीराव फुले होते . म . जोतीराव फुले यांनी धर्म , संस्कृती आणि इतिहास यांचे टीकात्मक आकलन केले . चार्तूवर्ण्ये , अस्पृश्यता , जन्मजात वर्चस्व , स्त्री पुरुष भेदाभेद आणि गुलामगिरी अशा जीवन रचनेच्या विरुद्ध आयुष्यभर प्रखर लढा उभारला . आपल्या अखेरच्या कालखंडात म . जोतीराव फुले ' सार्वजनिक सत्यधर्म " नावाचा ग्रंथ लिहित होते . हे काम चालू असताना त्यांना अर्धांगवायूचा झटका आला . त्यांचा उजवा हात , उजवा पाय लुळा झाला

निळ्या माणसांची निळी नाती

Image
निळ्या माणसांची निळी नाती १. निळे पहाड निळे पाणी  निळ्या स्पंदनाची निळी कहाणी २. निळे आभाळ निळा वारा निळ्या पाखरांचा निळा निवारा ३. निळी आग निळी जाग निळ्या फुलांची निळी बाग ४. निळी पुस्तके निळी पाने निळ्या क्रांतिचे निळे गाणे ५. निळे झेंडे निळ्या घोषणा निळ्या डोळ्यांच्या निळ्या तृष्णा ६. निळे डोंगर निळ्या वाटा निळ्या पावलांच्या निळ्या लाटा ७. निळी बालके निळे फुगे निळ्या क्षितिजावर   निळी युगे ८. निळे श्वास निळे ध्यास निळ्या पृथ्वीचा निळा व्यास ९. निळी माता निळी ममता निळ्या पदरात निळी समता १०. निळा सूर्य निळी माती निळ्या माणसांची निळी नाती -                                          - राजेंद्र गोणारकर                                                     

pustak prakashan

Image
बुद्ध पौर्णिमा १४ मे १४ सुप्रसिद्ध साहित्यिक  दत्ता भगत यांच्या तीन  पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात बोलतांना दत्ता भगत मंचावर  राजेंद्र गोणारकर , भीमराव शेळके व इतर