Posts

Showing posts from November, 2014

म. जोतीराव फुले यांचे स्मरण करतांना ....

Image
म. जोतीराव फुले यांचे स्मरण करतांना  .... .                                                             डॉ . राजेंद्र गोणारकर                                                                         ९८९०६१९२७४ तमाम बहुजनांचे कृ ति शील कैवारी असणार्‍या म . जोतीराव फुले यांच्या निधनास २८ नोव्हेंबर २०१५ रोजी १२५ पूर्ण होतील.  त्यांच्या शतकोत्तर रौप्य स्मृतिवर्षास आजपासून (२८ नोव्हेंबर २०१४)  प्रारंभ होत आहे. त्या निमित्त हा लेख. ________________________________________________________         भारतातील तमाम बहुजनांच्या शिक्षणा चे ज्ञानपीठ म्हणजे म . जोतीराव फुले होते . म . जोतीराव फुले यांनी धर्म , संस्कृती आणि इतिहास यांचे टीकात्मक आकलन केले . चार्तूवर्ण्ये , अस्पृश्यता , जन्मजात वर्चस्व , स्त्री पुरुष भेदाभेद आणि गुलामगिरी अशा जीवन रचनेच्या विरुद्ध आयुष्यभर प्रखर लढा उभारला . आपल्या अखेरच्या कालखंडात म . जोतीराव फुले ' सार्वजनिक सत्यधर्म " नावाचा ग्रंथ लिहित होते . हे काम चालू असताना त्यांना अर्धांगवायूचा झटका आला . त्यांचा उजवा हात , उजवा पाय लुळा झाला