Anna Bhau Sathe /अण्णा भाऊ साठे : वेदना आणि संघर्षाचे भाष्यकार
अण्णा भाऊ साठे : वेदना आणि संघर्षाचे भाष्यकार समाज व्यवस्थेच्या वरवंट्या खाली शतकानुशतके भरडल्या जाणाऱ्या माणसांच्या वेदनांना अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून उद्गार दिला . पण केवळ दुःखाचा करूण विलाप त्यांनी केला नाही तर या दमन आणि शोषणाविरुद्ध आपल्या शब्दांद्वारे संघर्षाचा एल्गार पुकारला. पांढरपेशी मराठी साहित्य जेव्हा कलारंजनात बुडाले होते नि दलित साहित्याचा उगम झालेला नव्हता अशा वेळी अण्णा भाऊ साठे यांनी हा जागर मांडला होता हे लक्षात घेतले तर त्यांच्या ऐतिहासिक कार्याची महती आपसूक कळून येते. वारणेच्या खोऱ्यातील वाटेगाव (जि. सातारा ) या गावात भाऊराव आणि वालूबाई यांच्या पोटी १ ऑगस्ट १९२० रोजी जन्मलेल्या अण्णा कडे होते तरी काय ? अण्णाचे शाळेतील शिक्षणात मन रमले नाही हे खरे ! जेमतेम दोनच दिवस शाळेत गेलेल्या अण्णाची शिक्षणाची उमेद मात्र परत जागविली त्यांच्या मावस भावाने . मावसभावाकडे " पांडवप्रताप " , " रामविजय " ...
Comments
Post a Comment