Ramabai Ambedkar

एक दंतकथा वाटावी इतकी रमाईच्या जीवनाची कहाणी अद्भुत आहे.असीम त्याग, अतोनात कष्ट, आभाळाएवढी सहनशीलता,धरतीची उदारता, नक्षत्रलख्ख चारित्र्य ,निस्सीम प्रेम याचे मूर्तिमंत रूप म्हणजे रमाई. त्यांची जीवन कहाणी ही अश्रूंची गाथा आहे, पण हे असे दुःख आहे ज्याने वंचितांच्या जीवनात उजेडाची वस्ती आणली , सुखाचे सोहळे आणले, सन्मानाचे जगणे आणलेे. अखंड सोसणे आणि बाबासाहेबांना अविरत साथ देणे, हेच रमाईच्या जगण्याचे  संविधान होते।
            रमाईच्या जीवनावर कादंबरी लिहीणे ही सोपी गोष्ट नाही. रमाईशी,त्यांच्या वेदनेशी जोडून घेतल्याशिवाय असे लेखन करणे अवघड आहे.आयुष्मती लता शिंदे यांनी अत्यंत सहृदयतेने रमाईचे चरित्र तपशिलासह रेखाटले आहे. कादंबरीची भाषा वेधक आहे. ती वाचकांच्या  मनाचा ठाव घेते. ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. आयुष्मती लता नागनाथ शिंदे लिखित "माझी रमाई"  ही चरित्रात्मक कादंबरी वाचकांना निश्चितच प्रेरक ठरेल, असा विश्वास वाटतो।


                                                                                                                                   डॉ. राजेंद्र गोणारकर 

Comments

Popular posts from this blog

Anna Bhau Sathe /अण्णा भाऊ साठे : वेदना आणि संघर्षाचे भाष्यकार

दलित, विद्रोही कविताच खरी भारतीय कविता! Loknath Yashwant

Dr. Gangadhar Pantawane